ता. वरुड, जि. अमरावती
माझी वसुंधरा अभियान, ग्रीन स्कोअरबोर्ड, वृक्ष दत्तक योजना व शाश्वत विकास
गावातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व भावी पिढीसाठी हिरवेगार बाभुळखेडा घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान १ झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन करावे, असे ग्रामपंचायतीतर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
गावाच्या हद्दीत रस्त्यांच्या दुतर्फा, शाळा व स्मशानभूमी परिसरात देशी झाडांची (वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, करंज) लागवड व ट्री-गार्ड संवर्धन.
लागवड झाडे: 2,500 जिवंत प्रमाण: 92%घरोघरी घंटागाडीने ओला व सुका कचरा संकलन, कंपोस्ट खत निर्मिती युनिट आणि १००% प्लॅस्टिक पिशव्या बंदी.
दैनिक संकलन: 100% घरे कंपोस्ट युनिट: कार्यरतगावातील पाझर तलाव खोलीकरण, नाला बंडिंग आणि सर्व शासकीय इमारतींवर छतावरील पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याची व्यवस्था.
शेततळी: 10 पाझर बंधारे: 3ग्रामपंचायत कार्यालय, पाणी उपसा पंप व ५० सौर पथदिव्यांवर सौर ऊर्जेचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी केले आहे.
सौर क्षमता: 15 KW वार्षिक वीज बचत: ₹1.8 लाख