ता. वरुड, जि. अमरावती
गावाचा शाश्वत विकास आणि आधुनिक नागरी सुविधा - ग्रामपंचायत बाभुळखेडा
गावातील सर्व ३३२ कुटुंबांना ६०,००० लिटर क्षमतेच्या आरसीसी पाण्याच्या टाकीद्वारे दररोज प्रति व्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाणी पुरवठा केला जातो.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १० शेततळी व नाला खोलीकरणाची कामे पूर्ण झाली असून भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
गावातील सर्व अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे असून वरुड-अमरावती मुख्य हमरस्त्याशी बारमाही पक्का डांबरी रस्ता जोडलेला आहे.
शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी सुलभ व्हावे म्हणून प्रमुख शेत पाणंद रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण करण्यात आले आहे.
गावातील प्रमुख रस्ते, चौक, शाळा व स्मशानभूमी परिसरात ५० हून अधिक सौर पथदिवे बसवून प्रकाश व्यवस्था केली आहे.
शेतीपंपांसाठी स्वतंत्र कृषी फिडर आणि गावासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवून सुरक्षित वीज पुरवठा सुनिश्चित केला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात कॉम्प्युटराइज्ड आपले सरकार केंद्र कार्यरत असून रहिवासी, जन्म-मृत्यू, ७/१२ व इतर दाखले त्वरित मिळतात.
घरोघरी घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा संकलन केले जाते तसेच बंदिस्त भूमिगत गटारे व शोषखड्ड्यांची सुविधा आहे.